भारताच्या अव्यवस्थित व्यवस्थेत हरवलेल्या कोटी बेरोजगार तरुण आणि हतबल  कृषि उत्पादक वर्गासाठी  business Gateway तयार करणे गरजेचे आहे.

 15 ते 40 वय असलेला तरुण वर्ग , ही देशाची कार्यशक्ति आहे  . नवीन कल्पनांचा साठा आणि भविष्यासाठी आशावाद असलेले नागरिक देशात पर्यावरण ,व्यवसाय ,विज्ञान ,राजतंत्र या क्षेत्रामध्ये खरा बदल आणण्यासाठी सक्षम असतात .लोकशाही मध्ये लोकानी निवडून दिलेल्या सरकारचे कर्तव्य असते की देशाच्या प्रत्येक नागरिकाला योग्य  शिक्षण आणि देशात असलेल्या साधन संपतीचा वापर करून देशाच्या नागरिकांसाठी रोजगार आणि उद्योग निर्मिती करणे .नागरिकांना स्वावलंबी बनवणे ,देशात वस्तु आणि सेवा तयार करणे आणि त्याची निर्यात करणे , देशाच्या आंतरिक गरजा पूर्ण करणे 

    आज आपल्या देशात परिस्थिति अव्यवस्थित आहे , औद्योगिक क्रांतीच्या काळात 1900 व्या शतकात तयार केलेल्या नोकर पद्धती नुसार शिक्षण घेऊन हजारो तरुण मुले-मुली नोकरीच्या शोधात दिवसरात्र संघर्ष करत आहेत .ज्यांच्या हाती नोकरी आहे त्यांना कोणत्याही  प्रतिष्ठा आणि प्रोत्साहना शिवाय , नोकरी जाण्याच्या दबावात ,मानसिक,शारीरिक ,आर्थिक रित्या पिळवणूक केली जात आहे 

 हि परिस्थिति बदलणे आहे , इच्छा आणि प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्ति साठी महिना पाच लाखापेक्षा जास्त उत्पन्न देणाऱ्या व्यवसायांची  निर्मिती करणे ,पारंपारिक शिक्षण पद्धतीवर अवलंबून न रहाता इंटरनेट आणि भारतीयांच्या सवयी, त्यांच्या इंटरनेट वापरण्याच्या पद्धतीचा विचार करून देशात नवीन व्यवसायाच्या संधी , त्यासाठी लागणारे महत्वाचे ज्ञान , वस्तू आणि सेवांच्या विक्रीसाठी नवीन पर्यायी व्यापार पद्धती आणि आणि त्यासाठी आयटी सिस्टम्स तयार करणे आपले ध्येय आहे. 

 

कृषि देशाचा पाया असतो , देशासाठी अन्न आणि  व्यवसायांसाठी कच्चा  माल कृषिक्षेत्रातून येतो. कृषि  ,अन्नपूरवठा ,माल वाहतूक या क्षेत्रांना इंटरनेट च्या मदतीने एकत्र करणे आणि लाखों मध्यम उद्योग तयार करणे शक्य आहे . 

भारताची 60% लोकसंख्या शेती , पशुपालन ,मासेमारी या प्राथमिक व्यवसायात आहे . 

1970 पासून रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिवापर केल्याने देशाची जमीन नापीक झाली ,शेतीतून पीक घेण्यासाठी खतांवर हजारो खर्च करावे लागत आहेत 

असंघटित असलेल्या भारताच्या या प्राथमिक क्षेत्रात पारदर्शिता नाही . देशाच्या बाजार आणि मागणीचा कोणताही अंदाज नाही ,योग्य पिकाची निवड करण्यासाठी कोणतीही विश्वासार्ह माहिती नाही .

देशाचे लाखों शेतकरी मोजक्या पिकांचे उत्पादन घेतात , सप्लाय आणि  डिमांड यात येत असलेल्या फरकामुळे बाजारभाव खाली पडतो , देशाच्या 90 % कृषि उत्पादक कर्जात असण्याचे हे एक मुख्य कारण आहे .

शेती ,पशुपालन ,मासेमारी , मालवाहतूक , फूड प्रोसेसिंग , फूड डिस्ट्रिब्यूशन या व्यवसायांना 

संघटित ( organize) ,

एकप्रमाण (standardize) ,

पारदर्शी ( transparant )

मध्यस्थी विरहित (commision / midlemen free) बनवणे गरजेचे आहे 

कृषिउत्पन्न एकत्रित विकण्यासाठी , बाजारातील मागणीचा योग्य अंदाज मिळवण्यासाठी , उत्पादन खर्च कमी आणि योग्य पिकाची निवड करण्यासाठी , ग्राहक आणि उत्पादक यांना जोडण्यासाठी , देशात आणि जगात वाढत असलेल्या ऑर्गनिक फूड साठीच्या ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी भारतात प्राथमिक व्यवसायांसाठी e-business gateway तयार करणे  गरजेचे आहे .

Agriculture / कृषि 
Animal husbondry / पशुपालन 
Fishing / मासेमारी 
Horticulture / फलोत्पादन बागायती
Agriculture input needs / कृषि गरजा 
 
e-business Gateway / विक्री / माहिती /व्यवसाय /वाहतूक
सुरक्षित भविष्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे.